मराठ्यांचे राज्य संपुष्टात कधी आले?www.marathihelp.com

मराठ्यांचे राज्य संपुष्टात कधी आले?
1818 साली मराठा साम्राज्य संपुष्टात आलं.

साम्राज्याची घसरण

मुघल सत्ता ढासळत असताना इ.स. १७५६-इ.स. १७५७ मध्ये अफगाणिस्तानच्या अहमदशाह अब्दाली याने दिल्ली ताब्यात घेतली. पेशव्यांनी आपले सैन्य अफगाणांचा सामना करण्यासाठी पाठवले. यात जानेवारी १३, इ.स. १७६१ या दिवशी मराठ्यांचा निर्णायक पराभव झाला. हे पानिपतचे तिसरे युद्ध म्हणून ओळखले जाते. यानंतर मराठा साम्राज्याचा विस्तार थांबून विभाजन होण्यास सुरुवात झाली.

१७६१ नंतर पाच मराठा राज्ये स्वायत्त झाली. इ.स. १७७५ मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीबरोबर पहिले युद्ध लढण्यात आले. यात मराठा सरदारांनी एकजूट होउन इंग्रजांचा सामना केला परिणामी अनेक ठिकाणी इंग्रजांचा पराभव झाला इ.स. १८०२ मध्ये इंग्रजांनी बडोद्याच्या वारसदाराला अंतर्गत वादात मदत केली. बडोद्याला वेगळे राज्य म्हणून मान्यता देऊन त्याबदल्यात त्यांनी इंग्रजांच्या प्रभुत्वाची पावती मिळवली. दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात (इ.स. १८०३-इ.स. १८०५) मराठ्यांनी स्वातंत्र्य तर वाचवले पण ओडिसा, गुजरात इत्यादी भाग गमवावे लागले. तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात (इ.स. १८१८) मराठ्यांना पराभव पत्करावा लागला आणि जवळजवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता आली. यात पुणे आणि देशावरील इतर भाग कोल्हापूर आणि सातारा यांचा अपवाद वगळता इंग्रजांच्या हातात गेले. ग्वाल्हेर, इंदूर आणि नागपूरही इंग्रजांच्या राज्यात 'स्वतंत्र संस्थाने' म्हणून सामील झाले.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 13:26 ( 1 year ago) 5 Answer 5717 +22